बिजींग : “कोविड -19′ रूग्णासह रूग्णालयातील वॉर्डांच्या हवेच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आलेल्या नवीन अभ्यासानुसार करोनाचा विषाणू सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वाच्या दुप्पट म्हणजे 13 फूट (चार मीटर) पर्यंत जाऊ शकतो असे आढळले आहे. चीनी संशोधकांच्या तपासणीचे प्राथमिक निरीक्षण शुक्रवारी “अमेरिकन सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’ (सीडीसी) च्या “इमर्जिंग इन्फेक्टीव्ह डिसिसीज’ या जर्नलमध्ये प्रकाशित केले गेले. या रोगाचा प्रसार कसा होतो या विषयावर सातत्याने वाढत असलेल्या वादावर यामध्ये भाष्य केले गेले आहे.
थोड्या अंतरावर आढळलेले विषाणू संसर्गजन्य नसतात, असा इशारा स्वतः वैज्ञानिकांनीच दिला आहे. बीजिंगमधील ऍकॅडमी ऑफ मिलिटरी मेडिकल सायन्सेसच्या पथकाच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी वुहानमधील हुओशेशन हॉस्पिटलमधील कोविड -19 वॉर्ड आणि अतिदक्षता विभागातील वस्तूंचा पृष्ठभाग आणि हवेच्या नमुन्यांची चाचणी केली. या हॉस्पिटलमध्ये 19 मार्च ते 2 एप्रिलपर्यंतच्या 24 रुग्णांवर उपचार सुरू होते.
त्यांना आढळले की विषाणू जास्त प्रमाणात वॉर्डांच्या फरशीवर जमा झाले होते. कारण बहुतेक गुरुत्वाकर्षणामुळे आणि हवेच्या प्रवाहामुळे बहुतेक विषाणूं असलेले स्रावाचे थेंब तरंगत जमिनीवर पडले होते. कॉम्प्युटरचा माऊस, कचरापेटी, पलंगाचे कठडे आणि दरवाजाच्या मुठी अशा वारंवार स्पर्श केल्या जाणाऱ्या पृष्ठभागांवरहे विषाणूचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांच्या बुटांच्या तळव्यांवरील नमुन्यातही विषाणू असल्याचे तपासणीत आढळले.
खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर पसरणारे स्रावाचे थेंब लगेचच जमिनीवर पडतात. मात्र हे विषाणू दीर्घकाळापर्यंत हवेतच तरंगत असल्याचे तपासणीत आढळले. रुग्णापासून 13 फुटांपर्यंतही हे विषाणूंचे प्रमाण हवेत अधिक प्रमाणात असल्याचे आढळून आले आहे. 8 फूट उंचीवर देखेल या विषाणूंची संख्या कमे प्रमाणात आढळून आली आहे.