CoronaRule : जबरदस्तीने लग्नसोहळा रोखणाऱ्या ‘त्या’ जिल्हाधिकाऱ्यांना हटवले

अगरताळा- पश्‍चिम त्रिपुराचे जिल्हाधिकारी यांच्या विनंतीनंतर त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. कोविड -19 प्रोटोकॉलची अंमलबजावणी करताना त्यांनी जबरदस्तीने एका लग्नाचा कार्यक्रम रोखला होता.

शैलेश कुमार यादव यांनी मुख्य सचिव मनोज कुमार यांना पत्र लिहून त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू झाल्याने त्यांना पश्‍चिम त्रिपुराच्या डीएम पदावरून मुक्त करावे, अशी विनंती केली होती. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

शैलेश कुमार यादव यांच्या पत्रानुसार, 26 एप्रिल 2021 रोजीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी त्रिपुरा सरकारने उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत केली आहे. कॅबिनेटचे प्रवक्ते आणि राज्याचे कायदे मंत्री रत्नलाल नाथ म्हणाले की, मुख्य सचिवांनी यादव यांचे पत्र स्वीकारले आहे आणि तातडीने त्यांना या पदावरून मुक्त केले आहे. उद्योग व वाणिज्य संचालक हमेंद्र कुमार यांनी पश्‍चिम त्रिपुराचे डीएम म्हणून पदभार स्वीकारला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.