नवी दिल्ली – देशातील करोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 47 हजार 262 नवीन रूग्ण आढळून आले असून एकाच दिवसांत इतके रूग्ण आढळून येण्याचा या वर्षातील हा एक उच्चांकच मानला जात आहे. त्यामुळे देशातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या आता 1 कोटी 17 लाख 34 हजार 58 इतकी झाली आहे.
नव्याने वाढणाऱ्या रूग्णांमुळे देशातील सक्रिय बाधितांची संख्याही वाढत असून आज देशात एकूण 3 लाख 68 हजार 457 सक्रिय बाधित आहेत. देशाचा रिकव्हरी रेटही कमी होत असून तो आता 95.49 टक्के इतका झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. देशात गेल्या 132 दिवसात आज प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात करोनाचे रूग्ण आढळून आले आहेत.