पटना – संपूर्ण देशात करोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. अनेक रुग्ण ऑक्सिजन अभावी जीव सोडत आहेत. करोना महामारी आता धडकी भरवणारी झाली असून त्यातच बिहारमधील पटना येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेशन मास्तर असलेल्या पतीने करोना बाधित झालेल्या आपल्या पतीचा गळा कापून हत्या केली.
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने स्वत: घराच्या छतावरून उडी टाकून आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे, पतीने आपल्या मुलांसमोरच पत्नीची हत्या केली. यावेळी लहान मुलं रडत होते. पटना येथील कंकडबाग येथे ही घटना घडली असून सकाळी सात वाजता हे प्रकरण उघडकीस आलं.
स्टेशन मास्तर असलेल्या अतुल लाल (४९) याने करोनाबाधित पत्नी लुतीका यांची हत्या केल्यानंतर आत्महत्या केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. मागील काही दिवसांपासून लुतीका आजारी होत्या. त्यानंतर त्यांची करोना चाचणी करण्यात आली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर पती अतुल लाल तणावात होता. त्यावरून पत्नी-पत्नीचे भांडणही झालं होतं.