मुंबई – महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या दररोज झपाट्याने वाढत आहे. मुंबई आणि पुण्यात करोनाने थैमान घातले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी आणि चिरंजीव आदित्य ठाकरे यांना करोनाची लागण झाली होती. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना देखील करोनाची लागण झाली आहे.
अमित यांची करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घरातील इतर सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून तातडीने लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
याआधी ऑक्टोबरमध्ये अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यावेळी त्यांची करोना चाचणी निगेटीव्ह आली होती.