नवी दिल्ली, दि. 24 – कोविड -19 विरोधातील लढ्याचा भाग होऊन भारतीय हवाई दल, ऑक्सिजन भरून आणण्यासाठी लागणारा वेळ वाचावा म्हणून हवाई दल महाराष्टातील रिक्त ऑक्सिजन कंटेनर ऑक्सिजन केंद्रावर नेण्यासाठी विमानाचा वापर करत आहे.
आज सकाळी हिंडन हवाई तळावरून भारतीय हवाई दलाच्या एका सी -17 विमानाने पुणे हवाई तळाच्या दिशेने उड्डाण केले. सकाळी 10:00 वाजता या विमानाचे पुण्यात आगमन झाले. द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करणारे रिक्त कंटेनर ट्रक्स वेळेची बचत करण्यासाठी विमानातून नेत आहेत . हे विमान पुण्याहून सुटेल आणि हे कंटेनर आज दुपारी जामनगर हवाईतळावर उतरवले.
भारतीय हवाई दलाने तैनात केलेल्या आणखी एका सी -17 विमानाने आज पहाटे 2 वाजता सिंगापोर येथील चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी उड्डाण केले. सकाळी 07:45 वाजता या विमानाचे सिंगापोरला आगमन झाले. क्रायोजेनिक ऑक्सिजन टॅंकचे चार कंटेनर भरल्यानंतर ते सिंगापोरहून निघाले आणि पश्चिम बंगालमधील पनागढ़ हवाईतळावर दाखल झाले. संध्याकाळपर्यंत या विमानातील कंटेनर उतरविण्यात आले.