नवी दिल्ली – देशात ऑक्सिजन आणि संबंधित उपकरणांची अत्यधिक आवश्यकता लक्षात घेता, भारत सरकारने कामराजर पोर्ट लिमिटेडसह सर्व प्रमुख बंदरांना त्यांच्याकडून आकारले जाणारे जहाजाशी संबंधित शुल्क, साठवण शुल्क इत्यादी सर्व शुल्क माफ करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ऑक्सिजन संबंधित खालील मालास जागा वाटपात प्राधान्य देण्यास सांगितले आहे.
पुढील तीन महिने किंवा पुढील आदेशापर्यंत ऑक्सिजन सिलिंडर आणि संबंधित उपकरणे तयार करण्यासाठी स्टील पाइप्स. ऑक्सिजनशी संबंधित मालाला जहाजांवर जागा देण्यात प्राधान्य मिळावे, यासाठी बंदराच्या प्रमुखांना वैयक्तिकरित्या देखरेख ठेवण्यास सांगण्यात आले आहे. या मालाची चढउतार, वहन सुरळीत व्हावे, आवश्यक मंजुरी, दस्तऐवज यांची पूर्तता होऊन हा माल बंदरातून लवकर बाहेर काढता यावा, यासाठी सीमाशुल्क आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
जर जहाजात ऑक्सिजनसंबंधित वरील मालाव्यतिरिक्त इतर माल/ कंटेनर्स असतील तर ऑक्सिजन संबंधित मालासाठी शुल्कमाफी बंदरात हाताळल्या जाणाऱ्या एकूण माल किंवा कंटेनरची संख्या लक्षात घेऊन आकारणी असावी. अशी जहाजे, माल, बंदराच्या फाटकातून जहाज येण्या-जाण्यासाठीचा कालावधी याबाबतच्या माहितीवर बंदर, मालवाहतूक व जलमार्ग मंत्रालय देखरेख ठेवेल.