CoronaFight : ‘रेमडेसिविर’ला पर्याय ? केंद्र सरकारची झायडस कॅडिलाच्या औषधांना मंजुरी

नवी दिल्ली – देशावर करोना संसर्गाचे मोठे संकट घोंगावत आहे. दररोज ३ लाखांवर रुग्ण सापडत असल्याने आरोग्य सुविधा आणि औषधे कमी पडत आहे. करोना रुग्णांसाठी संजीवनी ठरत असलेल्या रेमडेसिविरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने करोना उपचासाठी झायडस कॅडिलाच्या औषधांना मंजुरी दिली आहे.

झायडस कॅडिलाच्या ‘व्हीराफिन’ औषधाला केंद्र सरकारकडून आपत्कालिन वापरासाठी मान्यता मिळाली आहे. देशातील शिखर संस्था असलेल्या ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने करोना गंभीर रुग्णांसाठी ‘व्हीराफिन’ औषधाला मान्यता दिली आहे. याबाबत कॅडिला हेल्थने माहिती दिली आहे. तसेच हे औषध 91.05 टक्के प्रभावी असल्याचे कंपनीने सांगितलं आहे. त्यामुळे करोना रुग्ण सात दिवसांत बरा होता. तसेच या औषधामुळं करोना रुग्णांना ऑक्सिजनची भासत असलेली गरज कमी होईल, असंही कंपनीने नमूद केलं आहे.

औषध निर्माती कंपनी झायडस कॅडिलाने ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI)  हिपॅटायटीससाठी (Hepatitis) वापरलं जाणारे पेगिलेटेड इंटरफेरॉन अल्फा -2 बी या औषधाचा वापर करोना उपचारात करण्यासाठी परवानगी मागितली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.