CoronaFight : करोनाविरुद्धच्या लढ्यात आता हवाई दलाची मदत; ऑक्सिजन कंटेनर ‘एअरलिफ्ट’

नवी दिल्ली – देशावर करोना संसर्गाचे मोठे संकट घोंगावत आहे. देशभरात करोना रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णालये अपुरी पडत आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. ऑक्सिजनअभावी अनेकांना जीव गमवावा लागत आहे. आरोग्य यंत्रणा करोनाविरुद्ध लढत असताना आता हवाई दलाने देखील या लढाईत पुढाकार घेतला आहे.


हवाईदलाच्या पथकाने आता ऑक्सिजन कंटेनर्स, आरोग्यांसंबंधीत उपकरणे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना एअरलिफ्ट करण्याची जबाबदारी घेतली आहे. भारतीय हवाई दलाच्या C17 या विमानातून दोन मोठे ऑक्सिजन कंटेनर्स तर IL 76 मधून एक रिकामी कंटेनर्स बंगालच्या पन्नागढमध्ये पोहचवण्यात आले. तसेच भारतीय हवाईदलानं डीआरडीओचे ऑक्सिजन कंटेनरदेखील बंगळुरूहून – दिल्लीच्या कोव्हिड सेंटरपर्यंत पोहचवले आहेत. भारतीय हवाई दलाकडून देशातील विविध राज्यांची ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी अनेक मोहिमा सुरु झाल्या आहेत.

यासह जर्मनीहून तब्बल 23 मोबाईल ऑक्सिजन जनरेशन प्लांट्सही आता भारतीय हवाईदल एअरलिफ्ट करणार आहे. यामुळे अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. भारतीय हवाईदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, IAF ने दिल्लीत डीआरडीओकडून उभारण्यात आलेल्या कोव्हिड 19 रुग्णालयात कोचीन, मुंबई, विशाखापट्टनम आणि बंगळुरू अशा अनेक भागांतून औषधं, उपकरणं आणि नर्सिंग स्टाफलाही एअरलिफ्ट केलं आहे. तसेच त्यांना विविध राज्यात उतरवले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.