CoronaFight : भारताला परदेशातून आतापर्यंत 6738 ऑक्‍सिजन कॉंसंट्रेटर्सची मदत

नवी दिल्ली – भारताबद्दल सदिच्छा दर्शवणाऱ्या जागतिक समुदायाने कोविड -19 विरोधातील सामूहिक लढाईत भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. भारताला प्राप्त झालेल्या मदत सामग्रीचे प्रभावी वाटप तसेच त्वरित वितरण केंद्र सरकारने सुरू केले आहे. सरकारला 27 एप्रिल 2021 पासून विविध देशांकडून आणि विविध संस्थांकडून आंतरराष्ट्रीय देणगी आणि कोविड-19 वैद्यकीय उपकरणे मदत पुरवठा प्राप्त होत आहे. एकूण 6738 ऑक्‍सिजन कॉंसंट्रेटर्स, 3856 ऑक्‍सिजन सिलिंडर , 16 ऑक्‍सीजन उत्पादन संयंत्र, 4668 व्हेन्टिलेटर्स, बीआय पीएपी, रेमडेसिव्हीरच्या सुमारे 3 लाख कुप्या 27 एप्रिल पासून 8 मे पर्यंत पाठवण्यात आल्या आहेत.

कॅनडा, थायलंड, नेदरलॅंड, ऑस्ट्रिया, चेक प्रजासत्ताक, इस्राईल, अमेरिका , जपान, मलेशिया, यूएस (गिलिएड), यूएस (सेल्सफोर्स) आणि थायलंडमधील भारतीय समुदायाकडून 8 मे रोजी 2404 ऑक्‍सिजन कॉंसंट्रेटर्स, 25,000 रेमडेसिविर, 218 व्हेंटीलेटर्स आणि 6,92,208 चाचणी कीट प्राप्त झाले आहेत.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.