पुणे : कोरोना विषाणूच्या रुग्णाची वाढणारी संख्या लक्षात घेता पुण्याच्या काही भागात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी हि माहिती दिली.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी अनावश्यक ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन देखील त्यांनी केले.
दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या 15 वर पोहोचली असून, काल पाच जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. खबरदारी म्हणून राज्य सरकारने सर्व शाळा, महाविद्यालये, मॉल्स,चित्रपटगृहे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र मॉल्समधील ड्रग्ज, भाजीपाला सुरू राहणार आहे. याशिवाय कोणतेही दुकान सुरू ठेवले जाणार नाही, अशी माहिती म्हैसकर यांनी दिली.