भुवनेश्वर – देशातील करोना स्थिती अद्याप आटोक्यात आलेली नाही. अनेक राज्यात करोनाने रौद्ररुप धारण केलं आहे. आरोग्य सुविधांअभावी मृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यात हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. लग्नानंतर पाच दिवसांत एका नवदाम्पत्याचा संस्कार विस्कटला आहे. लग्नाच्या पाचव्याच दिवशी नवरदेवाचा करोनाने मृत्यू झाला आहे.
ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यातील एका गावात २६ वर्षीय तरुणाचा लग्नाच्या पाचव्या दिवशी मृत्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूने गावात खळबळ उडाली आहे. तसेच लग्नाला हजर असणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. प्रशासनाने देखील लग्नात उपस्थित असलेल्या लोकांची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.
राजकनिका पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या दुर्गादेवी पाडा गावात संजय कुमार नायक याचा विवाह ११ मे रोजी पार पडला. त्याचं लग्न बेगलोर येथे पार पडलं. त्यावेळी त्याला ताप आणि करोनाची लक्षण होती. लग्नानंतर प्रकृती बिघडल्याने त्याची करोना चाचणी करण्यात आली होती. १३ मे रोजी त्याचा करोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यानंतर त्याला घरीच क्वारंटाईन करण्यात आलं होते.
दरम्यान तब्येत बिघडल्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा १५ मे राजी मृत्यू झाला. मृत नवरदेवाच्या घरातील सर्वांचे चाचणीसाठी नमूने घेण्यात आले असून अद्याप अहवाल प्राप्त व्हायचा आहे.