ठाणे – देशात करोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. यातच मृतांचे प्रमाणे वाढले आहे. पहिल्या लाटेपेक्षा करोनाची दुसरी लाट अत्यंत घातक असल्याचं बोलल जात आहे. त्यातच आता करोना रुग्णांना म्युकोरमायकोसिस या आजाराची भीती निर्माण झाली आहे. करोनातून वाचलं तरी हा आजार रुग्णांसाठी घातक ठरत आहे. राज्यात या आजाराचा पहिला बळी गेली आहे.
म्युकोरमायकोसिस’ आजाराने शहरी भागात शिरकाव केला आहे. ठाणे आणि डोंबिवलीमध्ये म्युकोरमायकोसिसचा प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी म्युकोरमायकोसिसची लागण झालेल्या डोंबिवलीतील वृद्धाचा मृत्यू झाला आहे. राज्यात म्युकोरमायकोसिसमुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. मृत व्यक्तीचे नाव बाजीवार काटकर आहे. ते ६९ वर्षांचे होते.
डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात म्युकोरमायकोसिसची लागण झालेल्या सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालय प्रशासनाने यासंदर्भात अधिकृतरित्या काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाजीराव काटकर यांचा मृत्यू झाल्याची बाब डॉक्टरांनी खासगीत मान्य केली आहे. राज्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
म्युकोरमायकोसिस या आजारात रुग्णाच्या जगण्याची शक्यता केवळ 50 टक्के इतकी असते. तसेच रुग्णांना अंधत्त्व आणि इतर गंभीर व्याधी उद्धवू शकतात. म्युकोरमायकोसिस साथीच्या आजाराप्रमाणेही फैलावू शकतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.