CoronaDeath : क्रिकेटपटू आरपी सिंगच्या वडिलांचा करोनामुळे मृत्यू

मुंबई : संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या करोनाने भारतातही हाहा:कार माजवला आहे. दररोज ३ लाखांहून अधिक रुग्ण आढळत असून आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. त्यामुळे मृत्यूंचे प्रमाणही वाढले आहे. क्रिकेट जगातावरही करोनाचे सावट असून भारताचा क्रिकेटपटू आर.पी. सिंग यांच्या वडिलांचे करोनाने निधन झालं आहे.

पियूष चावला आणि चेतन साकरिया दोघांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी करोनाने निधन झाले होते. त्यात आता टीम इंडियाचा माजी खेळाडू रुद्रप्रताप सिंह याच्यावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आरपीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

यापूर्वी अनेक क्रिकेटपटूंच्या कुटुंबीयांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी बरेचजण करोनामुक्त झाले आहेत

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.