पुणे – मागील वर्षीपासून प्रत्येकाच्या व्यक्तीच्या आयुष्यात अनिश्चितता आली आहे. या सगळ्यात तरुण वयोगट तुलनेने अधिक भरडला आहे. ऑनलाइन शिक्षण, बेरोजगारी, नातेवाईक आणि समाजाची टिप्पणी आणि या सगळ्यात वाढणारा ताण अशा भावनांची सरमिसळ तरुणाईच्या मनात आहे. तर काहींच्या नोकऱ्या गेल्या आहे. त्यांचा समोर सुद्धा करिअर आणि भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
परिणामी नैराश्यदेखील वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र, या सगळ्यातून बाहेर पाडण्यासाठी काही तरुण स्वत:हून प्रयत्न करतांना दिसत आहे. अशातच नोकरी गेल्यामुळे हिंमत न हारता ओडिशातील एका तरुणाने आपलं व आपल्या कुटूंबाचे पालन पोषण करण्यासाठी एक नवी शक्कल लढवली आहे.
ओडिशातील एका तरुण मजुराचं नाव इसक मुंडा तो ३५ वर्षीय आहे. त्याचे सातवीपर्यंत शिकले झाले, असून लॉक डाऊनपूर्वी तो हातची मजुरीचे काम करत असे मात्र लॉक डाऊनमुळे हातात काही काम नसल्याने त्यांना साठवलेला पैसाही खर्च करावा लागला.
या दरम्यान, त्याच्या मित्रांनी त्याला युट्यूब चॅनेल काढण्याचा सल्ला दिला, यानंतर त्याने Isak Munda Eating असं या युट्यूब चॅनेलचं नाव आहे. या चॅनलवर तो स्थानिक लोकांचे त्याचा कुटूंबाचे आणि स्वःताचे व्हिडियो शेअर कुरु लागला. त्यांचा या व्हिडियोला सोशलवर वरील नेटकऱ्यांकडून दाद मिळत गेली आज त्याचे साडे सात लाख सबस्क्रायबर्स आहेत. त्याचा एक व्हिडियोला ३५ हजार रुपये युट्यूब मिळाले आहे.
याबाबत माध्यमांशी बोलतांना सांगितलं, “मी माझ्या गरीब घरात आणि गावात हे व्हिडीओ तयार करतो. आम्ही काय आणि कसं खातो हे लोकांना दाखवतो. माझे व्हिडीओ लोकांना आवडत आहेत याचा आनंद आहे. मला आता यामधून चांगले पैसे मिळत आहेत,” असं इसक मुंडा सांगतात.