नवी दिल्ली – इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआर या संस्थेच्या वरिष्ठ वैज्ञानिकालाच करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आयसीएमआरच्या दिल्लीतील पूर्ण इमारतीचे सॅनिटायझेशन केले जात आहे. हा वैज्ञानिक मूळचा मुंबईतील आहे.
तो करोनाविषयक उपाययोजनांसाठी दिल्लीतील संस्थेत काम करीत होता. या संस्थेतील वैज्ञानिकांची गेल्या आठवड्यात एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. त्याला आयसीएमआरचे अध्यक्ष डॉ. बलराम भार्गव हेही उपस्थित होते. आता वैज्ञानिकालाच करोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संस्थेचे मुख्यालय पूर्ण बंद करण्यात आले असून सर्व कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोविड संबंधित टीमच्या काही आवश्यक लोकांनाच येथे येण्यास अनुमती देण्यात आली आहे.