बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रुई ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना योद्ध्यांचा गौरव करण्यात आला. नगरसेविका सुरेखा चौधर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या प्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, नवरसेविका सुरेखा पांडुरंग चौधर , शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष इम्तियाज शिकलकर, तहसीलदार विजय पाटील,उपमुख्यमंत्री कार्यालयचे अधीक्षक हनुमंत पाटील व शिवाजीराव भोसले,शब्बीर शेख,गोरख चौधर,अजिंनाथ चौधर,मधुकर शिरसट व पांडुरंग चौधर आदी मान्यवर उपस्तीत होते.
कोरोनाच्या महामारीत स्वतः च्या जीवाची व कुटूंबियाची पर्वा न करता रुग्णांसाठी दिवस रात्र सेवा देणारे रुई ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टर, नर्स,लेखनिक,ड्रायव्हर,सुरक्षा कर्मचारी आदी मुळे कोरोना वर पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकांचे जीव वाचवू शकलो म्हणून त्या सर्वांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करने व त्यांचा आत्मविश्वास वाढविणे हे आपले कर्तव्य असल्याचे मान्यवरांनी मनोगत मध्ये सांगितले.
या वेळी रुई ग्रामीण रुग्णालय चे वैदकीय अधीक्षक डॉ संजय दराडे व सर्व अधिकारी, कर्मचारी, सेवक आदींना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कोरोना योद्धा पुरस्कार मुळे काम करण्यास प्रोत्साहन मिळाले व येणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी काळजी व दक्षता घेण्याचे आव्हान डॉ संजय दराडे यांनी केले.
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर स्वागत नगरसेविका सुरेखा चौधर यांनी केले तर आभार पपांडुरंग चौधर यांनी मानले.