जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांचे प्रतिपादन
वाघोली – पारतंत्र्यातून स्वतंत्र झाल्यानंतर देशाने अनेक आव्हाने पेलली. आता, देशात कोरोना महामारीचे आव्हान उभे राहिलेले असताना लढण्यासाठी “कोरोना वाॅरिअर्स” पुढे आले. आताच्या कठीण काळात तेच खरे लढवय्ये आहेत, असे प्रतिपादन शिवसेना प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर कटके यांनी केले.
स्वातंत्र्यदिना निमित्ताने वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर, कर्मचारी, आशा कर्मचारी यांना कोविड योद्धा उत्कृष्ट कार्याबद्दल ट्रॉफी आणि सन्मान पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर कटके बोलत होते. वाघोली परिसरातील कोरोना योध्दा म्हणून काम करणाऱ्यांचे कटके यांनी कौतुक केले तर वाघोली हाऊसिंग सोसायटी असोसिएशनचे संचालक संजीवकुमार शंकर पाटील, नितीन कुमार जैन, किरण मनकवळे, हरचरंजित कुटालिया, संतोष कृष्णा यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आली.
यावेळी झालेल्या विशेष कार्यक्रमास वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गायकवाड, डॉ.नागसिंग लोखंडे, डॉ. अनिल निघुट, डॉ.रामदास खेडकर, वाघोलीच्या उपसरपंच मालती गोगावले, रेश्मा पचारणे,
शिवाजी कोरे, संतोष गणवाड, किसन आप्पा जाधव, बाळासाहेब शिंदे, सुनिल जाधवराव, गणेश गोगावले, केतन जाधव, पिंटू कटके आदी उपस्थित होते.
धान्यकिट वाटप…
शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपलब्ध करून दिलेले अन्नधान्य किटचे वाटप जिल्हा परिषद सदस्य कटके यांच्या उपस्थितीत वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघोली ग्रामपंचायत, आव्हालवडी, केसनंद, मांजरी खुर्द, भावडी येथे स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायत कर्मचारी तसेच आरोग्य सेवक कर्मचाऱ्यांना धान्यकिटचे वाटप करण्यात आले. या समाजोपयोगी उपकमाबाबत कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.