नवी दिल्ली – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. भारतातही कोरोना व्हायरसचे अनेक रूग्ण सापडले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपापल्या पातळीवर याचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र थर्मल स्क्रीनिंग सुरू करण्यात आली आहे. थर्मल स्क्रीनिंगच्या माध्यमातून करोनाची लागण झालेल्या व्यक्तीची ओळख पटू शकते.
सध्या देशातील काही रेल्वे स्थानकांवर थर्मल स्क्रीनिंग सुरू करण्यात आलं आहे. मात्र, भारतातील एका रेल्वे स्थानकांवरील एका थर्मल स्क्रीनिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कामातील हलगर्जीपणा पाहून तुम्ही तुमचं डोक बडवून घेतल्याशिवाय राहणार नाही. या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा व्हिडीओ एका पत्रकाराने ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.
हा व्हिडओ सध्या व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये, एक कर्मचारी हातामध्ये थर्मल स्क्रीनिंग मशीन घेऊन खूर्चीवर बसला आहे. आणि रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग व्यवस्थित प्रकारे करण्याऐवजी लाबंनूच थर्मल स्क्रीनिंग मशीन दाखवत आरामशीरपणे प्रवाशांना जाऊन देत आहे. या व्हिडीओमुळे कोरोना बाधित रूग्ण डिडेक्ट न होता जाऊ शकतो. या छोट्याशा चुकीमुळे कोरोना बाधीत रूग्ण निसटून त्यांचा अनेकांना हा संसर्ग होऊ शकतो. मात्र, संबंधित कर्मचाऱ्याला त्यांचे गांभिर्य असल्याचे दिसत नाही.