लॉस एंजेलिस : करोना विषाणूमुळे पसरलेली “कोविड-19′ रोगाची साथ ही नैसर्गिकपण उत्पन्न झालेल्या विषाणूमुळे पसरली आहे. या साथीला कारणीभूत झालेले कारण कोणत्याही प्रकारे कृत्रिमपणे प्रयोगशाळेमध्ये उत्पादित करण्यात आलेले नाही, असे नव्याने प्रकाशित झालेल्या अभ्यासामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
नेचर मेडिसिन या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासामध्ये अभ्यासकांनी करोना, सार्स-सीओव्ही -2 आणि संबंधित विषाणूंच्या सार्वजनिकपणे उपलब्ध जीनोम सीक्वेन्स डेटाचे विश्लेषण केले.
हा विषाणू प्रयोगशाळेत तयार झाला आहे कोणताही याचा पुरावा मिळाला नाही, असे अमेरिकेतील द स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूटमधील वैज्ञानिकांनी सांगितले. ज्ञात असलेल्या विषाणूंच्या जीनोम स्ट्रेनबरोबर तुलना केली असता हा विषाणू नैसर्गिकरितीने प्रक्रियेतूनच उत्पन्न झाला असल्याचा निष्कर्श आम्ही ठामपणे काढला आहे, असे या शोधनिबंधाचे सह-लेखक क्रिस्टियन अँडरसन यांनी सांगितले.
चीनी अधिकाऱ्यांना हा साथीचे रोग लवकर सापडला आणि मानवाला झालेल्या एकाच संसर्गानंतर मानवाकडून मानवाला झालेल्या संसर्गामुळे “कोविड -19′ च्या घटनांमध्ये वाढ होत आहे, असे या अभ्यासात म्हटले आहे.
सिक्वेन्स डाटाच्या आधारे संशोधकांनी गुणधर्मांवर लक्ष केंद्रीत करून “सार्स-सीओवी-2′ विषाणूची उत्पत्ती आणि प्रगतीचा माग काढला. मानवी आणि प्राण्यांच्या पेशींमध्ये शिरकाव करण्यासाठी या विषाणूकडून वापरण्यात येणाऱ्या स्पाईक प्रोटीन्सची अनुवंशिकताही तपासून बघितली गेली.
ज्या पेशीमध्ये शिरकाव होतो त्या पेशीच्या स्पाईक प्रोटीनच्या दोन प्रमुख घटकांवर संशोधकांनी लक्ष केंद्रीत केले. “सार्स-सीओव्ही-2′ विषाणूने यजमान पेशीच्या आवरणावर असलेल्या “एसीए2′ नावाच्या प्रोटीनला भेदले होते. हे प्रोटीन नेहमी रक्तदाब नियमित करण्यासाठी कार्यरत असते.
करोना विषाणू मानवी पेशीला इतक्या घट्ट बांधला जातो की त्याची उत्पत्ती नैसर्गिकपणे झालेली असावी. तो कृत्रिमपणे तयार केलेला असण्याची शक्यता नाही, असे संशोधकांनी म्हटले आहे. या निष्कर्शाला “सार्स- सीओव्ही-2′ विषाणूच्या संरचनेसंबंधीच्या डाटामुळे ठोस पाठबळच मिळाले आहे.