नाझरे-सुपेतील एकास करोना

नायगाव -पुरंदर तालुक्‍यातील नाझरे सुपे येथील एकाचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली.

नाझरे सुपे येथे एक व्यक्‍ती करोनाबाधित आढळून आले असल्याचे समजताच पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी नाझरे सुपे येथे येऊन पाहणी केली. रुग्णाचे घर, मधली वस्ती आणि कापरे वस्ती प्रतिबंधित क्षेत्र तर नाझरे सुपे गावठाण बफर झोन म्हणून जाहीर केले आहे. पुढील चौदा दिवस प्रशासनाच्या वतीने परिसरावर बारीक लक्ष ठेवण्यात येणार असून पहिले तीन ते चार दिवस नियमांचे कडेकोट पालन करण्यात येणार आहे.

रुग्णाच्या थेट संपर्कात येणाऱ्या नागरिकांना जेजुरी येथील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येणार असून इतर नागरिकांनाही घरातच क्वारंटाइन करण्यात येणार आहे, आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन सर्व्हे केला जात आहे. तसेच जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने चोक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक आबनावे, जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक अंकुश माने, उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी व शिक्षक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.