नवी दिल्ली – जपानच्या डायमंड प्रिन्सेस क्रूझवरील 64 जणांना कोरोनाची लागण झाल्याने जपानने हे क्रूझ समुद्रातच नांगरून ठेवले आहे. या क्रूझमध्ये 3700 प्रवाशी अडकले असून, त्यामध्ये 136 भारतीय आहेत. क्रूझमध्ये अडकलेल्या 136 भारतीयांपैकी 132 कर्मचारी आणि 6 प्रवाशी आहेत. क्रूझवरील कर्मचारी व प्रवाशांमध्ये असलेल्या भारतीयांना कोरोनाची लागण झालेली नाही. भारत सरकार त्यांच्या संपर्कात आहे.
पूझमधील 64 कोरोनाग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, कोरोनाचा फैलाव आणखी पसरू नये यासाठी योकोहामापासून दूर अंतरावर हे क्रूझ नांगरण्यात आले आहे. या क्रूझचा क्वारंटाईन कालावधी 19 फेब्रुवारीला संपणार आहे. जपानचे डायमंड प्रिन्सेस क्रूझ मागील सोमवारी योकोहामा बंदरात आल्यानंतर प्रवाशांची तपासणी केली असता 20 जण कोरोनाग्रस्त असल्याचे आढळले. त्यानंतर ती संख्या 64 पर्यंत गेली. त्यामुळे जपानने हे क्रूझ नांगरुन ठेवले आहे.