सावधान! corona vaccine येण्यापूर्वीच माफिया सक्रिय; इंटरपोलने दिला गंभीर इशारा

नवी दिल्ली – जवळपास वर्षभरापासून अवघ्या जगाला वेठीस धरलेल्या करोनावर ( corona ) कधी एकदा परिणामकारक लस ( corona vaccine ) येते याची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. लस आता अगदी उंबरठ्यावर आली असल्याने वर्षभराची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. किंबहुना ब्रिटनमध्ये तर पुढच्याच आठवड्यात लसीकरणाची ( corona vaccine update ) प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

मात्र लसीची ( corona vaccine ) प्रतीक्षा केवळ करोनापासून एकदाची मुक्ती मिळवण्यासाठी केली जातीये असा तुमचा समज असेल तर इंटरपोलने दिलेला इशारा तुमचे डोळे उघडणारा ठरणार आहे. इंटरपोल ( interpol ) या जागतिक स्तरावर काम करणाऱ्या पोलिस संघटनेने करोना लसीबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे.

लस येताच माफियांचे नेटवर्क सक्रिय होउन बनावट लसीद्वारे लोकांची फसवणूक करू शकतात असे इंटरपोलने म्हटले आहे. फायझर बायोएनटेकच्या लसीला ब्रिटनने मंजूरी दिली आहे. भारतातही पुढच्या महिन्यात लस उपलब्ध होण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.

असे असतानाच माफियांकडून बाजारात बनावट लसी आणल्या जाऊ शकतात व लोकांची फसवणूक केली जाऊ शकते असा गंभीर इशारा इंटरपोलने ( interpol ) दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.