रतन टाटा यांनी घेतली करोना लस; म्हणाले….

नवी दिल्ली – देशभरात लसीकराणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहेत. या टप्प्यात अनेक नेते मंडळी, सेलिब्रिटी अन्य जणांनी लस घेतली आहे. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनीही आज लसीचा पहिला डोस घेतला. 

रतन टाटा यांनी लसीकरणाचा अनुभव ट्विटर अकाउंटवर सांगितला. ते म्हणाले कि, मी आज लसीचा पहिला डोस घेतला. ही खूपच सोप्पी प्रक्रिया असून यावेळी थोडाही त्रास झाला नाही. प्रत्येकाला लवकरच  लस मिळेल, अशी माझी आशा आहे, असे रतन टाटा यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, करोना प्रतिबंधक लसीविषयी अद्यापही लोकांच्या मनात शंका आहे. याबद्दल अनेक अफवाही पसरवल्या जात आहेत. सरकारकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरु आहे. अशातच रतन टाटा यांचा चाहता वर्ग मोठया प्रमाणात असल्याने त्यांनी घेतलेली लस निश्चितच लसीकरण मोहिमेला उभारी देणारी ठरू शकेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.