लस नव्हे संजीवनी बुटी : डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली  – करोना विषाणूच्या साथीला प्रतिबंध करणारी लस संजीवनीप्रमाणे काम करेल. हनुमानाला संजीवनी आण्यासाठी खूप दूर जावे लागले होते, पण ही संजीवनी (व्हॅक्‍सीन) तुमच्या जवळच्या रुग्णालयात मिळत असल्याचे मत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केले.

करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्या दिवशी आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी करोना लस घेतली. त्यांनी खासगी रुग्णालय दिल्ली हार्ट अँड लंग्स इंस्टीट्यूटमध्ये 250 रुपये देऊन व्हॅक्‍सीन घेतली. आरोग्य मंत्र्यांसोबत त्यांच्या पत्नीनेही लस घेतली. आरोग्यमंत्र्यांनी “आयसीएमआर’ आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्‍सीनचा डोस घेतला.

दरम्यान, केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनीदेखील आज कोरोना लस घेतली. त्यांनी पटणा-एम्समध्ये पहिला डोस घेतला. तर, अल्पसंख्यक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये डालमिया रुग्णालयात लस घेतली.

देशात करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी को-विन पोर्टलवर जवळपास 25 लाख लोकांनी नोंदणी केली आहे. यामध्ये 24.5 लाख सामान्य लोक आणि इतर आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.