नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणूच्या लसीसाठी सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठकी घेण्यात आली. वेळेवर लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधानांनी अधिका अधिकाऱ्यांना तंत्रज्ञानाच्या विविध साधनांचे मूल्यांकन करण्याचे निर्देश दिले.
अशा प्रकारच्या लसीकरणासाठी सविस्तर योजना तातडीने हाती घ्यावी, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्देश दिले. बैठकीत भारतीय आणि जागतिक लसी विकास प्रयत्नांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.
Delhi: Prime Minister Narendra Modi today chaired a high-level meeting to review the preparations being undertaken for vaccination against #COVID19, as and when a vaccine is available. pic.twitter.com/HaAOIKX2wp
— ANI (@ANI) June 30, 2020
कोरोनाविरूद्ध जागतिक लसीकरण प्रयत्नांमध्ये सक्षम भूमिका बजावण्याची भारताची जबाबदारी व बांधिलकी यावरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.