लसीच्या सुरक्षिततेबाबतच प्रश्‍नचिन्ह?; नॉर्वेत 13 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा

ओस्लो – करोनाची लस सापडल्यानंतर जगभरातील नागरिकांनी सुटकेचा निश्‍वास टाकला होता. मात्र लसीबाबत विविध देशांतून ज्या बातम्या येत आहेत, त्या लसीच्या सुरक्षिततेबाबतच प्रश्‍नचिन्हा निर्माण करणाऱ्या ठरल्या आहेत. विशेषत: फायझरच्या लसीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्याचे कारण म्हणजे अगोदर पोर्तुगालमध्ये ही लस घेतल्यानंतर एका नर्सचा व त्यानंतर अमेरिकेतच एका डॉक्‍टरचा मृत्यू झाला होता. त्याला अन्य कारणे असू शकतात असे नमूद करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला असला तरी लसीच्या सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, नॉर्वेतही या लसीचे मोठे दुष्परिणाम दिसून येत असल्याचा दावा करण्यात येत असून त्यात आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला असल्याची बातमी आहे.

नवीन वर्षाच्या 4 दिवस आधी नॉर्वेमध्ये फायझर लस आणली गेली होती आणि 67 वर्षीय स्विन अँडरसनला प्रथम लस दिली गेली होती. त्यानंतर आतापर्यंत 33 हजार लोकांना लस देण्यात आली आहे. लसीकरण सुरू झाल्याने काही लोकांना याचे दुष्परिणाम होतील, असे जाहीर करण्यात आले होते.

रशियन वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, नॉर्वेजियन औषध एजन्सीने असे म्हटले आहे की 29 लोकांवर साइड इफेक्‍ट दिसून आले आहेत, तर लसीकरणानंतर आतापर्यंत 23 लोकांचा मृत्यू झाला आहे. तथापि, अद्याप यापैकी 13 जणांची तपासणी करण्यात येत आहे. मेडिसिन एजन्सीचे वैद्यकीय संचालक स्टीनर मॅडसेन यांनी देशातील राष्ट्रीय प्रसारक एनआरकेशी बोलताना सांगितले की, 13 मृत्यूंमध्ये गंभीर दुष्परिणामांच्या 9 घटना समोर आल्या आहेत.

संचालक स्टीनर मॅडसेन म्हणाले, “तपासात असे आढळले आहे की मृत्यू पावलेले बहुतेक लोक दुर्बल किंवा वृद्ध होते जे नर्सिंग होममध्ये राहत होते.” मृतांचे वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि त्यातील काही 90 वर्षांपेक्षा जास्त आहेत. ते म्हणाले, ‘असे दिसते की यापैकी काही जणांना करोना लस मिळाल्यानंतर ताप आणि अस्वस्थता होती. यानंतर ते गंभीर आजारी पडलेत आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

मॅडसेन यांनी ठामपणे सांगितले की, ‘ही प्रकरणे दुर्मिळ आहेत आणि हजारो लोकांना कोणत्याही गंभीर परिणामाशिवाय लस दिली गेली आहे. याचा अर्थ असा की ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्यात ते हृदयाशी संबंधित आजार आणि इतर अनेक गंभीर आजारांनी पीडित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.