Corona Vaccine : दिल्ली ‘एम्स’मध्ये होणार बालकांवर कोव्हॅक्‍सिनची चाचणी

नवी दिल्ली -येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रूग्णालयात बालकांवर कोव्हॅक्‍सिन या करोनावरील लसीची चाचणी होणार आहे. त्यासाठी 6 ते 12 वर्षे वयोगटातील लहानग्यांची निवड उद्यापासून (मंगळवार) केली जाणार आहे.

भारत बायोटेक कंपनीने कोव्हॅक्‍सिन ही स्वदेशी बनावटीची पहिली लस बनवली आहे. त्या लसीची 2 ते 18 वर्षे वयोगटावर चाचणी घेण्याची परवानगी महिनाभरापूर्वी भारतीय औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) दिली.

त्यानंतर 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची चाचणी घेण्यात आली. त्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. आता 6 ते 12 वर्षे वयोगटासाठीची चाचणी प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानंतर 2 ते 6 वर्षे वयोगटासाठीची चाचणी होईल. तिन्ही वयोगटांसाठीच्या चाचणीसाठी प्रत्येकी 175 जणांची निवड होणार आहे.

देशात सध्या 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. करोनाची तिसरी लाट येण्याचीही शक्‍यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बालकांचेही लसीकरण करण्याच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. त्यासाठी लसीच्या चाचणी प्रक्रियेला महत्व आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.