Corona Vaccine Big Benefit | लस घेतलेल्या 10 हजारांपैकी केवळ 4 जणांनाच बाधा, ICMR संचालक बलराम भार्गव यांची माहिती

नवी दिल्ली | केवळ लसीकरणानेच करोना थोपवता येतो हे आता सर्वांनीच मान्य केले आहे. लसीकरणानंतर करोना संसर्ग होण्याचा धोका खुप कमी असल्याची माहिती समोर आली आहे.

आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, 17 लाख 37 हजार 178 व्यक्तींनी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला होता. त्यापैकी 0.04 टक्के लोकांना करोना विषाणूची लागण झाली आहे. त्याचवेळी कोविशिल्डचा दुसरा डोस घेत असलेल्या 1 कोटी 57 लाख 32 हजार 754 लोकांपैकी 0.057 टक्के लोकांना विषाणूची लागण झालीय.

पुढे बोलताना भार्गव म्हणाले, करोना लसीमुळे संसर्गाची जोखीम कमी होते त्यामुळे मृत्यू आणि गंभीर् संक्रमण टाळले जाऊ शकते. कोव्हॅक्सिनचे आतापर्यंत 1.1 कोटी डोस देण्यात आले आहेत. त्यांपैकी 93 लाख लोकांना पहिला डोस घेतला आहे. त्यापैकी 4,208 जण करोनाबाधित आढळले. म्हणजेच 0.04 टक्के लोकं संक्रमित झाले. जे प्रति 10 हजार मागे चार आहेत. तर लसीचा दुसरा डोस घेतलेल्या 17 लाख 37 हजार 178 पैकी केवळ 695 जणांना करोनाची लागण झाली. जे की हे प्रमाण 0.04 टक्के आहे.

ब्रेकथ्रू इन्फेक्शन –

बलराम भार्गव यांनी ब्रेकथ्रू इन्फेक्शनबाबतही माहिती सांगितली आहे. ते म्हणाले, जर एखाद्याला लसीकरणानंतर करोना संसर्ग झाला तर त्याला ब्रेथथ्रू इन्फेक्शन म्हणतात. आणि सध्या ब्रेकथ्रू इन्फेक्शनचे प्रणाम खुप कमी आहे.

दरम्यान, करोना व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतल्यानंतर 21 हजाराहून अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे. तर दुसरा डोस घेतल्यानंतर 5 हजार 500 हून अधिक लोकांना संसर्ग झाल्याची माहिती बुधवारी केंद्र सरकारकडून जाही करण्यात आली आहे. त्यामुळे करोनाला थोपवण्यासाठी सर्वांचं लसीकरण करणे हे म्हत्वाचे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.