पुणे – दिवाळी होऊन आठवडा उलटला तरी अद्याप करोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग कमीच आहे, त्यातून आता दुसऱ्या डोसच्या लाभार्थ्यांची संख्या मात्र वाढली आहे. दिवाळीचे काही दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आले होते.
त्यातून सणसमारंभ असल्याने नागरिकांनी लस घेणे टाळले. लस घेतल्यानंतर ताप आणि अन्य लक्षणे दिसतात, ऐन सणासुदीत हा प्रकार होऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी घेतल्याचे
दिसून येते. त्यामुळेच लसीकरणाचा वेग कमी झाला. मात्र, दिवाळी होऊन आठवडा झाला तरी अद्याप म्हणावा तसा वेग वाढलेला दिसून येत नाही.
हा वेग वाढावा यासाठी सर्वस्तरावरून प्रयत्न सुरू झाले आहेत. घरोघरी जाऊन जनजागृती केली जात असून, नागरिकांनी लस घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले जात आहे. क्षे
त्रीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या मदतीने विविध भागामध्ये फिरून ही माहिती गोळा केली जात असून, ज्या नागरिकांची लस घेण्याची मानसिकता नाही, त्यांचे विविध माध्यमातून समुपदेशन केले जात आहे. पहिला डोस घेणारेही अद्याप शिल्लक आहेत.