नवी दिल्ली – ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने हैदराबादस्थित स्वदेशी फार्मा कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेडला निर्देश दिले आहे. कोविड -19 लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात काही अटींसह 5 ते 18 वर्षे वयाच्या मुलांच्या क्लिनिकल चाचणीस मंजुरी देण्यात आली आहे.
ही चाचणी विषय तज्ज्ञ समितीच्या (एसईसी) शिफारशींच्या आधारावर 10 ठिकाणी आयोजित केली जाईल. चाचणीला परवानगी मिळालेली ही भारताची चौथी करोना लस आहे.
यापूर्वी, देशात विकसित केलेल्या झायडस कॅडिला, झायकोव डीच्या आणीबाणीच्या वापरास मंजुरी दिली होती, जी देशातील 12 ते 18 वयोगटातील लोकांना उपलब्ध होईल. ही पहिली कोविड -19 विरोधी लस असून या व्यतिरिक्त, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्हॅक्सला 2 ते 17 वर्षांच्या मुलांवर चाचण्यांना मंजुरी मिळाली आहे.
याशिवाय 5 ते 18 वर्षे वयाच्या मुलांमध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत.