पुणे – करोनाच्या लसीकरणात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना स्थान असणार आहे. यामध्ये शासकीय आरोग्य संस्था, वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र, तसेच खासगी आरोग्य संस्थेतील आरोग्य कर्मचारी यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये इतर आजार असलेले रुग्ण आणि वयोवृद्ध, तर तिसऱ्या टप्प्यात इतर सर्व नागरिकांना लस देण्यात येणार आहे.
करोना लसीकरणाकरीता जिल्हा अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृती दल समिती स्थापन करण्यात आली असून, त्यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची दुसरी बैठक नुकतीच झाली. यात करोना लसीकरण पूर्वतयारीबाबत आढावा आणि चर्चा करण्यात आली.