‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ लसींच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या नवे दर

नवी दिल्ली – जगभरात करोना विषाणूने थैमान घातले असून त्याचा फटका भारताला सुद्धा बसला आहे. देशात करोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याचे चित्र आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला जात आहे. करोनावर आळा घालण्यासाठी एकमेव उपाय तो म्हणजे लस. देशात लसीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे. दरम्यान कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.

भारतात तीन लसींना मजुंरी देण्यात आली आहे. त्यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुतनिकव्ही या लशी देशात देण्यात येत आहेत. दरम्यान या लशींच्या किंमतीत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. लसींचे दर जानेवारी ते जुलै या कालावधीसाठी निश्चित करण्यात आले होते. त्यात या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या एका डोससाठी अनुक्रमे 200 आणि 206 रुपयांचा दर निश्चित करण्यात आला होता. मात्र सरकारसाठी असलेल्या या दरात आता वाढ केली आहे. यापुढे कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीसाठी आता अनुक्रमे 205 आणि 215 रुपये सरकारला मोजावे लागणार आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली असून नव्या किंमतीनुसारच सरकारला ऑर्डर द्यावी लागणार असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.