नवी दिल्ली – देशांत आतापर्यंत 38कोटी 76 लाख कोरोना प्रतिबंधक लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 38,76,97,935 मात्रा देण्यात आल्या आहेत.गेल्या 24 तासात 37,14,441 मात्रा देण्यात आल्या.
21 जून 2021 पासून कोविड-19 सार्वत्रिक लसीकरणाचा नवा टप्पा सुरु झाला आहे. देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे, असे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले.
कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3 कोटी एक लाख चार हजार 720 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात 41 हजार रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे होण्याचा दर 97.28 टक्के आहे.
गेल्या 24 तासात 38,792 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद
सलग 17 दिवस 50 हजारपेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत आहे. केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेशा यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे. भारतात आज उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,29,946 असून उपचाराधीन रुग्ण संख्या ही एकूण पॉझिटीव्ह रुग्ण संख्येच्या केवळ 1.39 टक्के आहे.
देशाच्या कोरोना चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ होत असून गेल्या 24 तासात 19,15,501 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत 43.59 कोटीहून अधिक (43,59,73,639) चाचण्या करण्यात आल्या.