Corona : अमेरिकेचा भारताला मदतीचा हात,विमानाने पाठवले ४०० ऑक्सीजन सिलेंडर

वॉशिंग्टन – करोना विरोधातील लढ्यामध्ये अमेरिका भारताला शक्‍य तेवढी मदत करेल आणि भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील, असे व्हाइट हाऊसच्या एका निवेदनात सांगण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून या आठवडाभरात भारताला करोना संबंधित साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,अमेरिकेच्या हवाई दलाचं सुपर गॅलॅक्सी विमान शुक्रवारी सकाळी नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालं.या विमानातून ४०० ऑक्सिजन सिलेंडर्स, रुग्णालयांसाठी लागणारं वैद्यकीय साहित्य तसंच १० लाख रॅपिट करोना टेस्ट किट पाठवण्यात आलं आहे.

तत्पूर्वी,या साहित्यामध्ये 1000 ऑक्‍सिजनचे सिलिंडर, 1.5 कोटी एन-95 मास्क आणि दहा लाख रॅपिड डायग्नोस्टिक चाचण्या किट यांचा समावेश आहे.भारतातील परिस्थिती करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जगभरातून भारताच्या या कोरोना विरोधातील लढ्यासाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

या कामात अगोदर अमेरिका उदासीन होती.मात्र देशांतर्ग दबाव निर्माण झाल्यावर आता बायडेन प्रशासनालाही हालचाल करावी लागते आहे. भारताने अडचणीच्या काळात अमेरिकेला मदत केली होती. आता त्याच भावनेने आम्ही भारताला मदत करू, असे बायडेन यांनी म्हटले आहे.त्याकरताच आता अमेरिकेनेही पुढाकार घेतला असून येत्या आठवड्यात भारताला 7.41 अब्ज रुपयांच्या आरोग्य साहित्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे व्हाइट हाऊसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.