करोनाने पुन्हा आणले जेरीस; या वर्षीही बऱ्याच देशांवर लॉकडाऊन लावण्याची वेळ

न्यूयॉर्क – सातत्याने वाढणाऱ्या करोना रुग्णांच्या संख्येमुळे या वर्षीही बऱ्याच देशांना लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. फ्रान्स, इटलीनंतर बांग्लादेशनेही शनिवारी 7 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. सध्याच्या परिस्थितीत जगात 13,14,41,030 लोकांना करोना संसर्ग झाला असून 28,60,578 लोकांचा मृत्यू झाला आहे.

ब्राझिलमध्ये करोना संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढले असून तेथे अंतिम संस्कारासाठी जमीन कमी पडत आहे. मागील 24 तासात ब्राझिलमध्ये 78,238 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे आणि 2,922 लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यांच्यावर अंतिम संस्कार करुन दफन करायलाही जमीन कमी पडत आहे.

इटलीमध्ये वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इस्टरवरही निर्बंध लादण्यात आलेत. 3 दिवसांसाठी कडक राष्ट्रव्यापी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून सोमवारी सगळ्या भागांना रेड झोन म्हणून बंद करण्यात आले आहे. शनिवारी इटलीत 21,247 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर मृतांची संख्या 376 एवढी आहे.

सगळ्यात जास्त प्रभावित झालेल्या अमेरिकेतही नवीन रुग्णांची भर पडते आहे. येथे नव्याने 63,841 रुग्णांची नोंद झाली तर मृतांची संख्या 748 एवढी आहे. आतापर्यंत इथे एकूण 3, 13. 83,126 रुग्णांची नोंद झाली, तर 5,68,513 लोकांनी आपला जीव गमावला आहे.

शनिवारी पाकिस्तानमध्ये 5,020 रुग्णांची नोंद झाली तर मृतांची संख्या 81 एवढी होती. करोनाच्या तिसऱ्या लाटेसोबत झुंजणाऱ्या पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 68,288 लोक संक्रमित झाले आहेत, तर 14,778 लोकांनी आपला जीव गमावला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.