पिंपर (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात नव्याने सहा रुग्णांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, पुणे-ताडीवाला रस्ता येथील 35 वर्षीय महिलेला आज “डिस्चार्ज’ देण्यात आला. आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये तिघे एकाच कुटुंबातील असून इचकेवाडी-कवठे यमाई (ता. शिरूर) येथील रहिवासी आहेत.
पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या सहा रुग्णांमध्ये 3 ज्येष्ठ महिला, 1 ज्येष्ठ नागरिक, एक दहा वर्षांची मुलगी आणि 35 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. बाधित रुग्णांमध्ये येरवडा येथील दोघे आहेत. तर, अहिरवडे (ता. मावळ) येथील एक जण आहे. त्याशिवाय, इचेवाडी-कवठेयमाई (ता. शिरूर) येथील एकाच कुटुंबातील तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर हद्दीतील 13 संशयित रुग्णांना आज उपचारासाठी दाखल करण्यात आले. एकूण 65 बाधित रुग्णांतील 27 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यातील 8 रुग्ण अत्यवस्थ आहेत. 24 जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 6 रुग्णांना अन्य रुग्णालयात हलविले आहे.