कोल्हापूर- कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे.त्यात संध्याकाळी आलेल्या अहवालाने आणखी 16 रुग्णांची भर पडली आहे. तर याआधी आज दुपारी 19 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे दिवसभरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 35 वर पोहोचला आहे.
आज दिवसभरात आलेल्या पाॅसिटिव्ह अहवालांमुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 171 झाली आहे. काही दिवसांपुर्वी जिल्ह्यांतरगत वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे अनेक जिल्ह्यातून विद्यार्थी, मजूर किंवा अडकलेले कोल्हापूरमध्ये परतले. त्यात मुंबईहून परतलेल्यांनी संख्या तुलनात्मक जास्त असल्याची माहिती मिळते आहे.
दरम्यान, कोल्हापूरची कोरोना पाॅसिटीव्ह संख्या सतत वाढत असल्याने आणि ती संख्या प्रवाशांंमुळे वाढत असल्यामुळे कोणत्याही शहरातून कोल्दापूरमध्ये प्रवाशांना पाठवू नका, असं विधान पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं होतं.