आकडा पुन्हा 1 लाखाच्या घरात; आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढणार

नवी दिल्ली- देशात नवे रूग्णवाढीचा आकडा आता पुन्हा एकदा 1 लाखाच्या घरात जाउन पोहोचला आहे. किंबहुना गेल्या वर्षी साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून एकाच दिवसात जेवढे रूग्ण सापडले नव्हते, तेवढे आता सापडत आहेत. जागतिक मंचावर अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सोमवारी भारतात एकाच दिवसात करोनाचे 1,03,844 नवीन रुग्ण वाढले आहेत. रूग्णवाढीच्या या संख्येमुळे भारताने ब्राझीलचा रेकॉर्ड मोडला आहे. अमेरिकेत करोना रुग्णांची एकूण संख्या 31,420,331 आहे. तर 5,68,777 मृत्यूची नोंद आहे. 

ब्राझील हा याबाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. ब्राझीलमध्ये संक्रमणाची संख्या 12,984,956 वर गेली आहे. ज्यात 3,31,530 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात करोनाची संसर्गाची संख्या 12,589,067 इतकी आहे. ज्यात 165,132 जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोना रुग्णांना बेड मिळणे कठीण होत चालले आहे. जर करोनाचे रुग्ण असेच वाढत राहिले तर आरोग्य विभागावर मोठा ताण येण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.