नगर (प्रतिनिधी) – करोना संसर्गाविषयी नगर जिल्ह्यात काल खूपच आशादायी चित्र तयार झाले होते. आज पुन्हा रुग्णसंख्येत भीतीदायक वाढ झाली. त्यामुळे नगरमध्ये करोना संसर्ग अक्षरश: सापशिडीचा खेळ खेळत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. नव्या रुग्णसंख्येत काल मोठ्या प्रमाणात घसरण झाली. आज कालच्यापेक्षा जवळपास दुपटीने नवी रुग्णसंख्या वाढल्याने चिंताजनकस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात आज 2 हजार 566 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 63 हजार 252 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 86.30 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 3963 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 23 हजार 751 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 962, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 2160 आणि अँटीजेन चाचणीत 841 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 48, अकोले 01, जामखेड 152, कर्जत 03, कोपरगाव 30, नगर ग्रामीण 81, नेवासा 73, पारनेर 55, पाथर्डी 71, राहता 67, राहुरी 100, संगमनेर 61, शेवगाव 131, श्रीगोंदा 15, श्रीरामपूर 22, कँटोन्मेंट बोर्ड 42, मिलिटरी हॉस्पिटल 07 आणि इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 492, अकोले 44, जामखेड 18, कर्जत 15, कोपरगाव 91, नगर ग्रामीण 255, नेवासा 99, पारनेर 126, पाथर्डी 33, राहाता 198, राहुरी 88, संगमनेर 201, शेवगाव 77, श्रीगोंदा 52, श्रीरामपूर 254, कँटोन्मेंट बोर्ड 25 आणि इतर जिल्हा 87 आणि इतर राज्य 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 841 जण बाधित आढळुन आले. मनपा 83, अकोले 05, जामखेड 04, कर्जत 09, कोपरगाव 124, नगर ग्रामीण 78, नेवासा 63, पारनेर 128, पाथर्डी 15, राहाता 54, राहुरी 129, संगमनेर 26, शेवगाव 09, श्रीगोंदा 80, श्रीरामपूर 21, कँटोन्मेंट 03 आणि इतर जिल्हा 10 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 578, अकोले 114, जामखेड 86, कर्जत 106, कोपरगाव 119, नगर ग्रामीण 191, नेवासा 109, पारनेर 106, पाथर्डी 97, राहाता 301, राहुरी 215, संगमनेर 140, शेवगाव 67, श्रीगोंदा 158, श्रीरामपूर 138, कॅन्टोन्मेंट 18 आणि इतर जिल्हा 23 अशा रुग्णांचा समावेश आहे.
करोना अपडेट्स
बरे झालेली रुग्ण संख्या:1,63,252
उपचार सुरू असलेले रूग्ण:23751
जिल्ह्यातील एकूण मृत्यू:2164
एकूण रूग्ण संख्या:1,89,167