रेल्वेत विलगीकरण कक्ष तयार करण्याची प्रक्रिया सुरु

पुणे : राज्यात बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यात मध्य रेल्वे विभागाने  विलगीकरण कक्ष तयार करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. डेपो घोरपडी येथील कोच दुरुस्थी केंद्रावर विलगीकरण कक्ष तयार करण्याचे काम चालू आहे.

दरम्यान, देशात कोरोनाबाधितांचा आकडा आज ४ हजार ४२१ वर पोहचला आहे. तर, कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ११४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी राजस्थानमध्ये २७, महाराष्ट्रात २३, गुजरातमध्ये १९, हरियाणामध्ये १६, मध्य प्रदेशात १२, कर्नाटकात  १२ आणि मुंबईतील धारावी येथे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासांत कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला, तसेच ३५४ नवीनकोरोना रुग्ण वाढले आहेत. त्याच वेळी, कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या 4421 पर्यंत वाढली आहे. तर, ३२५ जण पूर्णपणे बरे झाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.