नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत करोनाचे 44 हजार 111 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेले काही दिवस नवीन करोना रुग्णांची संख्या आहे त्याच पातळीवर असल्याचे दिसून आले आहे.
तथापि 44 हजार 111 हा आकडा गेल्या 86 दिवसांतील सर्वात नीचांकी आकडा आहे असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 4 लाख 95 हजार 533 वर पोहचली आहे.
सक्रिय बाधितांची संख्या 97 दिवसांनंतर प्रथमच पाच लाखांच्या खाली आली आहे. देशाचा कोविड रिकव्हरी रेट आता 97.06 टक्क्यांवर गेला आहे. दैनंदिन पॉझिटीव्हीटी रेट 2.35 टक्क्यांवर आला आहे. गेले सलग 26 दिवस हा दर पाच टक्क्यांच्या खाली राहिला आहे.