ढाका – करोनाचा वाढता प्रादुभार्ओव रोखण्यासाठी बांगलादेशाने आजपासून आठवडाभर देशभर कठोर लॉकडाऊन लागू केला आहे. नागरिकांनी कारणाशिवाय घराच्याबाहेर पडू नया अशी सूचना करण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्री हा निर्णय जाहीर करण्यात आला. गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून प्रथमच देशात एकाच दिवसातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मृत्यूंची नोंद काल झाली आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेसमध्ये शुक्रवारी 108 नवीन मृत्यू आणि 5,869 नवीन रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 8,78 804 आणि एकूण मृत्यूच संख्या 13,976 इतकी आहे.
या वाढत्या आकटेवारीची दखल घाऊन 28 जून पासून पुढील आठवड्याभारासाठी कठोर लॉकडाऊन लागू असणार आहे. सोमवारपासून सरकारी, निमशासकीय आणि खाजगी अशी सर्व कार्यालये बंद राहतील. अत्यांत आवश्यक कारणाच्या पूर्वपरवानगशिवाय कोणालाही बाहेर जाऊ दिले जाणार नाही. जल वाहतुक आणि रेल्वे वाहतुक यापूर्वीच थांबवण्यात आली आहे.