corona update pune : पुण्यात करोनाचे नवे 134 बाधित आढळले

पुणे  -गेल्या 24 तासांतील करोना बाधितांची संख्या 134 असली, तरी मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 7 आहे. यात 5 जण पुण्याबाहेरील आहेत. रविवारी 211 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. आता शहरातील एकूण बाधितांची संख्या आता 5 लाख 385 झाली आहे; 

तर त्यातील 4 लाख 89 हजार 892 बाधित बरे झाले आहेत. सध्या 1,473 सक्रिय बाधित असून, त्यातील 182 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. तर 231 जणांना ऑक्‍सिजनवर ठेवण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत 8,694 संशयितांची स्वॅब टेस्ट झाली आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.