भारतात कोरोनाचे 508 नवे रुग्ण; एकूण संख्या 4789 वर पोहचली

नवी दिल्ली – देशभरात कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत असून भारतात करोनाचे 508 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासात समोर आलेली ही संख्या आहे. गेल्या 24 तासांमध्ये 13 मृत्यू झाले आहेत. तर करोनाग्रस्तांची संख्या ही आता 4 हजार 789 वर पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

आत्तापर्यंत करोनाची लागण झाल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या 124 झाली आहे. देशात सध्या 4 हजार 312 सक्रीय कोरोनाबाधीत रूग्ण विविध रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत 352 रूग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.