सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सोमवारी (दि. 11) रात्री जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार 34 नागरिकांच्या करोना चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी मंगळवारी दिली. दरम्यान, गेल्या 24 तासांत एकही करोनाबळी झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे.
सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात बुधवार पेठ तीन, प्रतापगंज पेठ एक, इतरत्र दोन, शाहूपुरी, देगाव प्रत्येकी एक, कराड तालुक्यात मलकापूर एक, पाटण तालुक्यात सांगवड, सोनाईचीवाडी, मारुल हवेली प्रत्येकी एक, फलटण तालुक्यात फलटण शहर, सांगवी प्रत्येकी दोन, कोळकी एक, खटाव तालुक्यात डिस्कळ दोन, वडूज एक,
माण तालुक्यात भक्तवडी एक, कोरेगाव तालुक्यात पिंपोडे बुद्रुक दोन, एकंबे एक, जावळी तालुक्यात पानस एक, महाबळेश्वर तालुक्यात महाबळेश्वर एक, खंडाळा तालुक्यात शिरवळ दोन, अजनुज एक, इतर पाच, असे एकूण 34 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 55 हजार 265 झाली आहे,
तर करोनाबळींची संख्या 1803 वर स्थिर राहिली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या एक हजाराच्या आत आहे, ही आणखी एक दिलासादायक बाब आहे.
जिल्ह्यातील 145 नागरिक करोनामुक्त
सातारा जिल्ह्यातील रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेतल्यानंतर 145 नागरिकांना मंगळवारी घरी सोडण्यात आले, तर 272 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा येथील जिल्हा रुग्णालयातील 18, कराड उपजिल्हा रुग्णालयातील 27, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 15, कोरेगाव 14, वाई 26, म्हसवड व रायगाव प्रत्येकी चार, खंडाळा 12, पानमळेवाडी 74, महाबळेश्वर सात, दहिवडी 11, पिंपोडे आठ व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 52, अशा एकूण 272 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
करोनाची सद्य स्थिती
एकूण नमुने – 296885
एकूण बाधित – 55265
घरी सोडण्यात आलेले – 52759
मृत्यू – 1803
उपचारार्थ रुग्ण – 703