वाल्हे (पुणे) – पुरंदर तालुक्यात बुधवारी (दि. 31) 90 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांपासून 80 च्या पुढे बाधित आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सासवडच्या शासकीय लॅबमध्ये बुधवारी 163 संशयितांपैकी सासवड शहर (46), माळशिरस, शिवरी, दिवे (प्रत्येकी 2), जेजुरी, पिसर्वे, कोडीत, काळेवाडी, भिवडी, झेंडेवाडी, तक्रारवाडी, बेलसर, बोपगाव, पारगाव, वाळुंज, वाल्हे, रिसेपीसे व सिंगापूर (प्रत्येकी 1) असे 17 गावांतील 66 जण तर जेजुरीच्या शासकीय लॅबमध्ये 56 संशयितांपैकी जेजुरी (11), पॉवर हाऊस (4), वीर (2), वाल्हा, पांडेश्वर, राख, नाझरे, मांडकी, रावडी, बेलसर (प्रत्येकी 1) असे 24 तर दोन्ही मिळून एकूण 90 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.