सातारा – जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 532 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर चार बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
चार बाधितांचा मृत्यू
सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 58 वर्षीय पुरुष (सदरबझार, ता. सातारा), 65 वर्षीय पुरुष (तारळे, ता. पाटण ), 72 वर्षीय पुरुष (मोरवे, ता. खंडाळा) व खासगी हॉस्पिटमध्ये करंजे 57 वर्षीय पुरुष (जि. पुणे) अशा एकूण चार बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
एकूण नमुने – 406322
एकूण बाधित – 66063
घरी सोडण्यात आलेले – 60217
मृत्यू – 1910
उपचारार्थ रुग्ण – 3936