कोरोना अपडेट – देशभरात गेल्या २४ तासांत १७५२ रुग्ण वाढले; ३७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – कोरोनाग्रस्तांच्या संख्येत गेल्या २४ तासांमध्ये १,७५२ रुग्णांची वाढ झाली असून यामुळे भारतातील कोरोनाग्रस्तांचा  एकूण आकडा २३,४५२ वर जाऊन पोहोचला आहे. याबाबतची अधिकृत आकडेवारी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या दैनंदिन वार्तालापाद्वारे देण्यात आली.

कोरोनाने गेल्या २४ तासांमध्ये ३७ जणांचा बळी घेतला असून या आजाराने आतापर्यंत ७२४ भारतीयांचे प्राण घेतले आहेत. याखेरीज कोरोनाला हरवण्यामध्ये आतापर्यंत ४,८१३ भारतीय यशस्वी झालेत. देशामध्ये सध्याच्या घडीला कोरोनाचे १७,९१५ रुग्ण उपचार घेत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.