देहूरोड – येथील आयुध निर्माणी कारखाना वसाहतीत राहणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. यावर त्याच्या संपर्कातील 64 कर्मचाऱ्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली असून, ते “लो रिस्क’ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
संबंधित कर्मचारी कारखान्यातील रुग्णालयास कोणतीही माहिती न देता दि. 1 जुलैपासून खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. दि. 5 जुलै रोजी त्याचा करोना अहवाल पाझीटिव्ह आला होता. यावर प्रशासनाने कारखानाच्या रुग्णालयात 64 कर्मचाऱ्यांची प्राथमिक तपासणी केली. या कर्मचाऱ्यांनी दि. 20 जुलैपर्यंत कामावर येता-जाता आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, कारखाना प्रशासनाने संबंधित कामगार राहात असलेली इमारत सील करत मार्गांवर अडथळे उभारले आहेत.